साकूर पठार भागाचा सर्वात मोठा प्रश्न सुटणार, सुजय विखेंनी दिली ग्वाही

संगमनेर(DSNews24) तालुक्यातील प्रलंबित असणारे अनेक प्रश्न आपल्याला सर्वांना ५ वर्षामध्ये सोडवायचे आहे. केवळ संगमनेरात नव्हे तर राज्यात परिवर्तन झालेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्या नंतर मुख्यमंत्र्यांना भेटून साकूर पठार भागावर उपसा जलसिंचन योजना मंजूर करून आणण्याची ग्वाही माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे डॉ. सुजय विखे यांचा वाढदिवस व सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते.

डॉ. सुजय विखे म्हणाले म्हणाले की, तालुक्यातील अनेक वर्षांपासून जे प्रलंबित प्रश्न आहे. त्यांना मार्गी लावायचे आहेत. जनसेवा मंच या अॅपच्या माध्यमातून आपण सर्व प्रश्न सोडवणार आहोत. कोणत्याही नेत्यापुढे अर्ज घेवून फिरावे लागणार नाही. आता अनेक लोक आपल्याला दबावात घेण्याचा प्रयत्न करतील पण आता घाबरायचे कारण नाही. गोरगरीब जनतेचा आवाज आता याठिकाणी ऐकला जाणार आहे. कोणाला धमकवणे, अपशब्द वापरणे हे आपल्या करायचे नाही. आता आपल्या आत्मसन्मानाने काम करायचे आहे. चाळीस वर्षाचा राग तुम्ही सर्वसामान्‍यांनी मतपेटीतून दाखवला आहे. आपल्या गाड्या जाळल्या, लोकांना मारले पण आता आपल्याला विकासाचे राजकारण करायचे असून तळेगाव, पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवायचा आहे. आपल्या मनातील राग शांत करून आता आपल्याला विकास करून दाखावयचा आहे. तसेच अमोलचा विजय हा सर्वांचा असून सर्वांचे हे यश आहे. कोणत्या एकटाचे यश नाही. त्यामुळे आज आपण संगमनेरात परिवर्तन करू शकलो. संगमनेर विधानसभेचा आमदार खताळ नसून आपण सर्व जण असणार सगळ्यांना न्याय मिळणार आहे. कोणीही आमदार म्हणायचे नाही भाऊ म्हणून हाक मारायाची आहे. आरोग्य, पाणी हे सर्व देण्याची जबाबदारी आपली आहे. पुढे जिल्हा परिषद निवडणुका आहे. ही सत्ता सर्व सामान्य माणसांची आहे प्रत्येक वाडी वस्तीवर आपल्या पोहोचायचे आहे. जो व्यक्ती त्याच्या गावात प्रश्न सोडवेल त्याला यापुढे संधी दिली जाईल. कारण सरकार आपले त्यामुळे विकासाची काम होतील असा विश्वास सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Comment