मेष : हितशत्रूंचा त्रास संभवतो. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आर्थिक लाभ होतील.
मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.
कर्क : एखादी गुप्त वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.
सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील.
तूळ : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कोणालाही जामीन राहू नका.
वृश्चिक : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
धनू : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मकर : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कुंभ : वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
मीन : गुरुकृपा लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
