मेष : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
मिथुन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
सिंह : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
तूळ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
वृश्चिक : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
धनू : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
मकर : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मीन : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
