संपूर्ण राज्यामध्ये हादरा देणारी घटना कर्जत तालुक्यातील कोपर्डी या ठिकाणी घडली होती. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. याच आंदोलनाची ठिणगी पडली आणि त्यातून मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला.
याच पीडित कुटुंबातील मुलगी सपना बबन सुद्रिक हिचा शुभविवाह आज पारनेर तालुक्यातील निघोज येथे संपन्न झाला. या विवाहासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर राम शिंदे व डॉक्टर सुजय विखे पाटील हे उपस्थित होते. या लग्नासाठी मराठा क्रांती मोर्चाचे राज्यातील सर्व पदाधिकारी हे आवर्जून उपस्थित होते.
विवाहाचं निमंत्रण होतं, त्यामुळे कोपर्डीत आलो. वधू -वराला शुभेच्छा दिल्या. आज दोन कुटुंब एकत्र येत आहेत. सर्वजण वधू -वराला आर्शीवाद देण्यासाठी या विवाह सोहळ्याला आले आहेत. मी वधू वराला शुभेच्छा देतो असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.
लग्नात मराठा मोर्चातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मराठा क्रांती मोर्चाची बोधचिन्ह असणारी केशरी रंगाची टोपी यावेळी घातली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या लग्नाला उपस्थित राहणार याबाबत मोठी गुप्तता पाळणत आली स्थानिक आमदार रोहित पवार यांना देखील याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. मराठा क्रांती मोर्चा च पदाधिकारी या लग्नासाठी आवर्जून उपस्थित होते.
