महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे अपहरण करून खून

बीड – केज तालुक्यातील मस्साजोग येथे सरपंचाचे अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मस्साजोग येथील सरपंचाचे अपहरण करून खून अपहरण करुन हत्या करण्यात आलीये. संतोष देशमुख असं सरपंचाचे नाव असून त्यांचा मृतदेह केज परिसरात आढळून आला आहे. 

अधिकची माहिती अशी की, सरपंच आणि त्यांचा भाऊ धारूर हून केजच्या दिशेने जात असताना अनोळखी इसमांनी गाडी आडवी लावून सरपंचांना मारहाण केली. त्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. जुन्या भांडणाची कुरापत काढून हा खून झाल्याचा आरोप मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाने केला आहे. सरपंचाचे भाऊ शिवराज देशमुख यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय. देशमुख यांचा मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून मोठा जमाव या ठिकाणी जमला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोग कडे जात असताना डोणगाव जवळ दोन वाहणातून येऊन अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवून गाडीची तोडफोड करून संतोष देशमुख यांचे अपहरण केले असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

मात्र काही तासानंतर बोरगाव – दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यामुळे तालुक्यात परिचित होते त्यांनी मस्साजोग ग्रामपंचायत ला अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमका हा घातपाताचा प्रकार कसा व का घडला याचा तपास केज पोलीस करत आहेत.

Leave a Comment