मुंबई : अभिनेता अल्लू अर्जूनला पुष्पा 2प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात हैद्राबाद पोलिसांनी अटक केली आहे. अल्लू अर्जूनच्या घरी जाऊन पोलिसांनी त्याला अटक केली. हैद्राबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचैंगरी प्रकरणात एका 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
तिच्या पतीने या प्रकरणाविरोधात पोलिसात FIR दाखल केली होती. झालेल्या प्रकारानंतर अल्लू अर्जूनने मृत महिलेच्या कुटुंबाला 25 लाखांची मदतही केली. दरम्यान अल्लू अर्जूनला अटक झाल्यानंतर मृत महिलेच्या पतीने ही केस मागे घेण्याची तयारी दाखवली आहे.
4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरच्या बाहेर झालेल्या गर्दीत 39 वर्षीय रेवतीचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिचा नवरा भास्कर याने पोलिसांत FIR दाखल होती. अल्लू अर्जूनला अटक केल्यानंतर भास्कर ही केस मागे घेण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे.
मृत महिला रेवती हिचा पती भास्कर याने म्हटलं आहे की, “मी केस मागे घेण्यास तयार आहे. मला अटकेची माहिती नव्हती आणि ज्या चेंगराचेंगरीत माझी पत्नी मरण पावली त्याचा अल्लू अर्जूनशी काही संबंध नाही.”
दरम्यान या प्रकरणात अल्लू अर्जूनला अटक झाल्यानंतर आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात अल्लू अर्जुनच्या आणखी अडचणी वाढू शकतात. अल्लू अर्जून जामिनावर बाहेर येणार की 14 दिवस जेलमध्ये राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
