मोठी बातमी! नाना पटोलेंच दिल्लीत पत्र, घेतला मोठा निर्णय 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला (MVA) महाराष्ट्रात मोठं यश मिळालं होतं. त्यामध्ये, 13 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीचं पानीपत झाल्याचं पाहायला मिळालं.

त्यामुळे, या पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोले (Nana Patole) यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा, अशा आशयाचं पत्र नाना पटोले यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलं आहे.

मला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर चार वर्ष पूर्ण झाली असून आता प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करावी, तसेच नवी कमिटी स्थापन करा, मला पदावरून मुक्त करा असे पत्रच नाना पटोलेंकडून मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा (Vidhansabha) निवडणुकीत पराभव झाल्यामुळे नाना पटोले यांनी ही भूमिका घेतल्याचे समजते.

Leave a Comment