संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीकरीता १८ जागेसाठी काल अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १०९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
कृषी पतसंस्था मतदार संघातून सर्वसाधारण-४३, महिला राखीव ६, इतर मागास प्रवर्ग-४ विमुक्त जाती भटत्या जमाती- ७, ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण-१७, अनुसूचित जाती 5 जमाती-८, दुर्बल घटक-४, व्यापारी, आडते मतदार संघ-५, हमाल, मापाडी मतदार संघातून १५ असे एकूण १०९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
दाखल उमेदवारी अर्जांची छाननी ६ एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल, त्यानंतर दि. ६ ते २० एप्रिल २०२३ या दरम्यान अर्ज माघारीची वेळ असणार आहे.
माघारीनंतर शिल्लक उमेदवारांना २१ एप्रिल रोजी चिन्ह (निशाणी) वाटप करण्यात येऊन अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे.
