राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी थंडी तर कधी उन्हाचा कडाका जाणवत आहे. अशातच आता हवामान विभागानं राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा (rain) इशारा दिला आहे.
लातूर, धाराशीव, नांदेड, संभाजीनगर,अहमदनगर, परभणी,बुलढाणा, जालना, जळगाव, अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये ७ ते ९ एप्रीलदरम्यान वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने (Rain) आधीच हैराण झालेला शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांवर (Farmer) अवकाळी पावसाच मोठं संकट निर्माण झालं आहे.
