भाजपकडे यापूर्वी असलेले गृहनिर्माण खाते शिवसेनेकडे गेले आहे. नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आले आहे. याशिवाय गृहनिर्माण आणि परिवहन खाते शिवसेनेला मिळणार असून त्यापैकी एक खाते शिंदे स्वतःकडे ठेऊ शकतात.
शिवसेनेला याशिवाय उद्योग, जलसंधारण, पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, रोजगार हमी, अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, खणीकर्म ही खाती भाजपाकडे असतील.
महसूल खात्यासाठी चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात स्पर्धा आहे. मात्र, चंद्रकांत पाटील हे बाजी मारण्याची शक्यता आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना पूर्वीचे ऊर्जा खाते मिळू शकते.
