मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागच्या ३ महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील जलवाहतूक सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली होती. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा, गेट वे ते एलिफंटा या सेवा पुन्हा सुरू झाल्या होत्या. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा, गेट वे ते एलिफंटा या सेवा पुन्हा सुरू झाल्या होत्या. यादरम्यान आज मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटला जाणारी एक प्रवाशी बोट बुडाली.
काय घडले नेमके?
एक बोट नेहमीप्रमाणे मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून सुटली अन् एलिफंटाला जात होती. त्यावेळी एक प्रवाशी बोट बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सदर ठिकाणी नौदल, JNPT, Coast guard, यलोगेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य चालू आहे. या बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी होते. त्यामधील 66 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. बाकी लोकांचे बचावकार्य सुरू आहे.
