मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. प्रवास सुखकर होतील.
मिथुन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
कर्क : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.
सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कन्या : महत्त्वाची कामे दुपारनंतर मागीं लागतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
तूळ : काही कामे धाडसाने पार पाडाल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
धनू : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी गुप्त वार्ता समजेल.
मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत. आध्यात्मिक प्रगती होईल.
कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
मीन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
