काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुढची राजकीय दिशा काय, असेल यावर स्पष्ट भाष्य केले आहे. “मी काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे. सध्या प्रदेश कमिटीत काम करत आहे.
पक्षात प्रदेश पातळीवर काही बदल असतील, तर त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झालो काय किंवा सामान्य कार्यकर्ता असलो, तरी पक्षासाठी काम करत आलो आहे. पुढेही काँग्रेसचेच काम करत राहील”, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
भाजप(BJP) नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संसदेत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी संगमनेरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. बाळासाहेब थोरात यांनी आंदोलनाचं नेतृत्व केले. आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होते.
