संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील चंदनापुरी शिवारातील जावळे वस्ती जवळील वनविभागाच्या हद्दीत बिबट्याच्या हल्ल्यात एक जण ठार झाल्याची घटना घडलीय. रामनाथ गुरूकले अस मयत व्यक्तीच नाव आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
सविस्तर वृत्त लवकरच…..
