मेष : तुमचा सकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला लक्षणीय यश मिळवून देईल. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. भविष्यातील महत्त्वाच्या योजनाही आखल्या जातील. मालमत्ता प्रश्नाशी संबंधित कामांमध्ये गडबड झाल्यामुळे तणाव येऊ शकतो. भावांसोबतचे वाद टाळा. तुमची साथही समस्या सोडवू शकते. व्यवसायाला चालना मिळेल.
वृषभ : राजकीय आणि सामाजिक कार्यात तुमचा सहभाग असेल. वाहनखरेदीबाबत नियोजन होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मित्रांसोबत मनोरंजनात वेळ वाया घालवू नये. कुटुंबातील वातावरण आनंदी राहिल.
मिथुन : आज तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. तुमचा मानसिक आणि शारीरिक थकवा दूर होईल. तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा प्रवाह जाणवू शकेल. कोणीतरी तुमच्या भावनिकतेचा आणि उदारतेचा फायदा घेऊ शकेल. कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करा. पती-पत्नीमध्ये योग्य सामंजस्य राहील. आरोग्य चांगले राहिल.
कर्क : आज काही महत्त्वाच्या व्यक्तींसोबत वेळ जाईल. नवीन यश मिळवाल. विकोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित योजनांचा पुनर्विचार करा. एक छोटीशी चूकही तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. घराची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येकाने शिस्त पालन आवश्यक. व्यवसायात केलेली बदलाची धोरणे लवकरात लवकर लागू करा. पती-पत्नीमधील मतभेद संवादातून सुटतील.
सिंह : घरातील बदलाबरोबरच नूतनीकरणाशी संबंधित योजना असेल. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. मालमत्तेवरुन नातेवाईकांत वाद होऊ शकतो. व्यवसायात अधिक व्यस्त राहाल.
कन्या : आज मालमत्तेसंबंधी प्रलंबित काम मार्गी लागले. त्यामुळे मानसिक तणावातून आराम मिळू शकतो. नातेवाईकांसोबत वादग्रस्त प्रकरणात मध्यस्थी टाळा. आपल्या योजना कोणासही उघड करू नका. व्यावसायिक क्षेत्रातील कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करू नका. घरातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्याची काळजी घ्या.

तूळ : आज तुमच्या निष्काळजीपणामुळे जवळच्या नातेवाईकाशी संबंध बिघडू शकतात. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. घरातील मोठ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. यंत्र आणि लोखंडाशी संबंधित व्यवसायात यावेळी लाभदायक यश मिळू शकते. पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा कायम राहिल.
वृश्चिक : आज धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. समाजात तुमच्या कार्याचा गौरव होईल. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या ते टाळा. आर्थिक बाबी सध्या सामान्य राहतील. अनावश्यक खर्चात कपात करा. व्यवसायात आज जास्त मेहनत करावी लागेल.
धनु : आज मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा विचार करत असाल तर त्याचा गांभीर्याने विचार करा. कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर कागदपत्रांबाबत सावधगिरी बाळगा. छोट्याशा चुकीचे मोठे परिणाम होऊ शकतात. अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवलंबणे फायदेशीर ठरू शकते. भागीदारीसाठी योग्य वेळ. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.
मकर : आज गरजू मित्राला मदत कराल. मुलांना मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरेल. तुमच्या मौल्यवान वस्तूंची चांगली काळजी घ्या. आज व्यापार क्षेत्राशी संबंधित कामांमध्ये काही व्यत्यय येऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्यामुळे कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी तुमचा आत्मविश्वास वाढेल.
कुंभ : ग्रहस्थिती तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास टिकवून ठेवेल. सामाजिकदृष्ट्याही तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमचे हे यश टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही सौम्य आणि आदर्शवादी स्वभाव राखणे फार महत्वाचे आहे. आर्थिक समस्यांमुळे चिंता राहील. घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या. व्यवसायात नवीन कामाची सुरुवात योग्य वेळ आहे.

मीन : दैनंदिन व्यवहारात काही बदल करण्यासाठी तुमच्या आवडीच्या कामांमध्ये वेळ व्यतित करा. कौटुंबिक वातावरणातही सकारात्मक बदल घडू शकतात. आर्थिक प्रश्न सोडविताना विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यवसायाशी संबंधित कोणतेही काम किंवा पैशाचे व्यवहार करताना काळजीपूर्वक निर्णय घ्या. पती-पत्नीच्या नात्यात मतभेद होऊ शकतात.