राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.सोबतच वादळी वाऱ्याचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान पाऊस, गारपीट आणि वादळ असं तिहेरी संकट पुढील दोन दिवस राज्यावर असणार आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला पाऊस झोडपण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव, नाशिक, आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पावसाचा इशारा दिला आहे.
तर विदर्भात अकोला जिल्ह्यासह इतर काही भागांमध्ये गारांसह पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा 30 तारखेनंतर गारठा वाढण्याची शक्यता आहे
