BREAKING! वाल्मिक कराड’बाबत केज कोर्टाचा मोठा निर्णय

walmik Karad Kej Court : केज कोर्टानं अत्यंत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टानं वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कस्टडी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता 14 दिवस वाल्मिक कराडचा मुक्काम कोर्टातच असणार आहे.

खंडणी प्रकरणतील आरोपी वाल्मिक कराडला आज केज न्यायालयात दाखल करण्यात आलं होत. आज न्यायाधिशांपुढे याप्रकरणी सुवानणी झाली आहे. यावेळी सरकारी वकिलासह वाल्मिक कराडच्या वकिलीने युक्तीवाद केला आहे. यानंतर न्यायालयानं 14 दिवसांच्या कोठडीचा निर्णय दिला आहे. त्यानंतर वाल्मिक कराड यांना बीड शहर पोलीस ठाण्यात नेण्यात येत आहे.

वाल्मिक कराड यांना पवनऊर्जा क्षेत्रातील कंपनी अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीनं केज कोर्टात हजर केले होते. वाल्मिक कराड आज सकाळी सीआयडीसमोर शरण आले होते.

अवादाचे प्रकल्प अधिकारी सुनिल शिंदे यांनी 2 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरुन वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केज न्यायालयाच्या न्यायाधीश बाविस्कर यांच्या समोर सुनावणी सुरु झाली होती. अखेर न्यायाधिशांनी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कस्टडी दिली आहे.

Leave a Comment