मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. कामे रखडण्याची शक्यता.
कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सिंह : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.
कन्या : मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
तूळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
वृश्चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राही.
धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
मकर : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
कुंभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
मीन : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
