नागरिकांना नव्या वर्षाचे गिफ्ट, गॅस सिलेंडर झालाय स्वस्त 

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 14.50 रुपयांची घट झाली आहे. 19 किलोंच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात झाली आहे.

तर, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट झाल्यानंतर आज राजधानी दिल्लीत 1804 रुपयांना मिळणार आहे. याआधी1818.50 रुपयांना गॅस सिलेंडर मिळत होता.

१ जानेवारी २०२५ रोजी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कपात केली असून दिल्ली ते मुंबई गॅस सिलिंडरचे दर १४ ते १६ रुपयांनी कमी झाले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांना आता १,८०४ रुपये मोजावे लागतील तर, मुंबईत व्यवसायिक सिलिंडरची किंमत १,७५६ रुपयांपर्यंत आहे.

जी याआधी १,७७१ रुपये होती. याआधी गेल्या महिन्यात म्हणजे पहिल्या डिसेंबरला महागाईचा मोठा धक्का बसला आणि १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली. मात्र आता दरात कपात करण्यात आल्याने हॉटेल आणि रेस्तरॉमधील बिल कमी होणार आहे.

Leave a Comment