हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात येत्या पाच दिवसात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. पण काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यताही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली आहे.
त्यानुसार, आज विदर्भात पावसाची शक्यता आहे. या भागात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळू शकतात. तर दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील किमान तापमानात घट देखील होण्याचा अंदाज आहे.
