श्रमदानातून खेड्यांचा विकास होतो – जयश्रीताई थोरात

संगमनेर(DSNews24)भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यांच्या समृद्ध व शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचे योगदान महत्त्वाचे आहे, यांच्या श्रमदानामुळे खेड्यांचा विकास करता येतो. विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना प्रेरित करता येते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना होते. आपल्या देशामध्ये अनेक जातीचे,धर्माचे, पंथाचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. सर्वांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवून येते. म्हणून देशाच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत आहे. आपली संस्कृती ही गौरवशाली आहे. माणुसकी जपणारा धर्म व संतांची शिकवण असलेला आपला देश.युवकांना संधी उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांनी एनएसएसच्या माध्यमातून स्वतःची प्रगती करावी. स्वयंसेवकांच्या श्रमदानातून खेडे विकासाच्या दृष्टीने समृध्द झाल्यास देश सशक्त बनेल असे प्रतिपादन एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात यांनी केले.

त्या संगमनेर तालुक्यातील साकूर येथील रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या युथ फॉर माय भारत अँड युथ फॉर डिजिटल साक्षरता या उपक्रमांतर्गत आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर शुक्रवार दि.10 जानेवारी 2025 ते गुरुवार दि. 16 जानेवारी 2025 या कालावधीत कामटवाडी ता.पारनेर येथे संपन्न होत आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य दिपक फिरोदिया होते. यावेळेस व्यासपीठावर एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात, अहिल्यानगर जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती शंकरराव पा. खेमनर , महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. हेमलता राठोड, सरपंच संजय काशीद, ग्रामविकास अधिकारी विजय आहेर, नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जालिंदर आहेर,  जय मल्हार देवस्थानचे सचिव कारभारी आहेर, दत्तात्रय आहेर, सचिन खेमनर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक प्रा. म्हतू खेमनर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ रोकडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

शंकरराव पा.खेमनर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणण्यात व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचा सर्वात मोठा वाटा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी खेड्याकडे चला असा संदेश दिलेला होता, त्यामुळे खेड्यांचा विकास होणे काळाची गरज आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. हेमलता राठोड यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले ,त्या म्हणाल्या की, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना समाजसेवा करणे, आपल्या जवळपासच्या परिसरातील लोकांमध्ये मिसळून त्यांना समजावून घेऊन रचनात्मक कार्य करणे व समाजसेवेच्या माध्यमातून स्वतःचा व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे हा मुख्य उद्देश राष्ट्रीय सेवा योजनेचा आहे.

जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांनी विद्यार्थ्यांना या श्रमसंस्कार शिबिराच्या प्रसंगी शुभेच्छा दिल्या.

या सात दिवसाच्या श्रमसंस्कार शिबिरातील स्वयंसेवक ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण, डिजिटल साक्षरता ,हुंडाबंदी विषयक जनजागृती, महिला सबलीकरण व सक्षमीकरण,नव मतदार नोंदणी व जनजागृती, पर्यावरण पूरक पर्यटन, गावाचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण, शाश्वत सर्वांगीण विकास, जैवविविधता सर्वेक्षण व गावाचा इतिहास, लोकसंख्या नियंत्रण व जिल्हा भरती प्रबोधन पथनाट्य, शिवार फेरी, आरोग्य तपासणी शिबिर इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहे असे कार्यक्रम अधिकारी प्रा. म्हतू खेमनर यांनी सांगितले.

या श्रमसंस्कार शिबिरास सीए.रमेशजी फिरोदिया, सविताताई फिरोदिया, इंद्रजीत पा.खेमनर,महिला व बालकल्याण समिती अहिल्यानगर मा.सभापती मीराताई शेटे, जिल्हा समन्वयक प्रा. रोहिदास भडकवाड, बाजीराव पा. खेमनर, इंद्रजीत पा. खेमनर, विद्यापीठाचे अधिकारी आदी मान्यवर सदिच्छा भेटी देणार आहेत.

या श्रमसंस्कार शिबिर कालावधीत स्वयंसेवकांना प्रा.डॉ. जिजाभाऊ घुले संस्काराचे महत्त्व, प्राचार्य प्रो. डॉ. हेमलता राठोड राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान, प्रा.बाबासाहेब खरात मन करा रे प्रसन्न , उपप्राचार्य डॉ. सचिन घोलप डिजिटल साक्षरता, डॉ.दत्तात्रय कांबळे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, प्रा.निलेश पर्वत प्रेम शब्दांच्या पलीकडे, प्राचार्य डॉ. बाबासाहेब देशमुख व्यक्तिमत्व विकासात राष्ट्रीय सेवेचे योगदान, विजय आहेर स्पर्धात्मक परीक्षांची पूर्वतयारी, डॉ. सुचित्रा गायकवाड कोरोना एक जैविक आपत्ती या वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहे.

हे श्रमसंस्कार शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी / विभागीय समन्वयक प्रा. म्हतू खेमनर ,प्रा. पोपट खेमनर, प्रा. राजेंद्र लेंडे ,प्रा. योगेश साळुंके, प्रा.शबाना शेख , विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. गणेश साळुंके सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी काम करत आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अर्पिता पुरी या विद्यार्थ्यांनी केले, तर आभार कला विभाग प्रमुख प्रा.कल्पना शेळके यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेंद्र लेंडे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.म्हतू खेमनर यांनी करून दिला. या वेळेस प्रा. वृषाली डोके,प्रा.शंकर राशीनकर व सर्व स्वयंसेवक,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment