मेष : मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृषभ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
मिथुन : कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
तुळ : सार्वजनिक कामात मानसन्मान लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
वृश्चिक : दैनंदिन कामे मार्गी लागतील. गुरूकृपा लाभेल.
धनु : वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत.
मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मतांविषयी आग्रही रहाल.
कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मीन : संततिसौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
