प्रयागराजमध्ये कालपासून महाकुंभाला सुरूवात झालीय. महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशीच एक मोठी दुर्घटना समोर आलीय. महापालिकेचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते महेश कोठे (Mahesh Kothe) हे देखील महाकुंभाला गेले होते.
त्यांना महाकुंभात (Mahakumbh) स्नान करत असताना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला अन् त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना सकाळी घडलेली आहे. सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते महेश विष्णूपंत कोठे यांचं उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते साठ वर्षांचे होते. या घटनेमुळे सोलापूर शहरावर मोठी शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश कोठे मित्रांसोबत कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला गेले होते.
प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात सकाळी ते स्नान करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या घटनेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. कोठे यांचं शहरातील मुरारजी पेठेतील घरासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सकाळपासून झाली होती. महेश कोठे यांची सोलापूर महापालिकेच्या राजकारणावर वर्चस्व असलेला नेता अशी ओळख होती. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे प्रमुख म्हणून देखील कोठे यांनी काम पाहिलंय.
