पारनेर (DSNews24/किरण पुरी)खडकवाडी येथील इयत्ता चौथी शिकणारी ईश्वरी पांडुरंग रोहकले हिचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ वेक्त होत आहे. परिसरात दररोज बिबट्याचा वावर होताना दिसत असल्यामुळे परिसरातील नागरिक भयभित झालेले आहेत. वन विभागाने याची त्वरित दखल घेऊन अजून वाट न पाहता,ठीक ठिकाणी ताबडतोब पिंजरा लाऊन बंदोबस्त करावा. ग्रामीण भागामध्ये शेती पंपांना रात्रीची वीज मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला रात्रीचे पाणी देने जिक्रीचे झाले आहे.
वन विभागाने वेळ न दवडता ताबडतोब बिबट्यांचा बंदोबस्त करावा. अशा मागणीचे पत्र भूमिपुत्र संघटनेच्या वतीने वन विभागाला देण्यात आले आहे या मागणीची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली कोणत्याही स्वरूपाचे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजेन्द्र रोकडे यांनी दिला आहे.
