अख्ख गाव रडलं, जुन्नरमधील “या” गावावर शोककळा

पुण्यात कंटेनरने अनेक वाहनांना चिरडण्याची घटना ताजी असताना दुसऱ्याच दिवशी नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. भरधाव आयशर ट्रकने मॅक्स ऑटोला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कांदळी गावातील ५ जणांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

पुणे – नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ शुक्रवारी झालेल्या अपघातात नऊ जण दगावले. या अपघातात मृतांमध्ये जुन्नरच्या कांदळी गावातील पाच जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ज्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमो गाडीचा या अपघातात चेंदामेंदा झाला त्या मॅक्झिमो गाडीचा मयत चालक विनोद रोकडे हाही याचं कांदळी गावचा असल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. गावात पूर्वीप्रमाणे एसटीबस येत असती, तर कदाचित हा अपघात टाळता आला असता, अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली.

या अपघातात देबुबाई दामू टाकळकर (वय ६५ वर्षे रा. वैशखखेडे तालुका जुन्नर), विनोद केरूभाऊ रोकडे (५० वर्षे, रा. कांदळी, जुन्नर , युवराज महादेव वाव्हळ ( वय २३ वर्षे रा. १४ नंबर कांदळी, ता. जुन्नर), चंद्रकांत कारभारी गुंजाळ (वय ५७ वर्षे, रा. कांदळी, ता. जुन्नर , गीता बाबुराव गवारे (वय ४५ वर्षे १४ नंबर कांदळी ता. जुन्नर) , भाऊ रभाजी बढे (वय ६५ वर्षे रा. नगदवाडी कांदळी, ता. जुन्नर) , नजमा अहमद हनीफ शेख (वय ३५ वर्षे रा.गडही मैदान, खेड राजगुरुनगर ) वशिफा वशिम इनामदार (वय ५ वर्षे) , मनीषा नानासाहेब पाचरणे (वय ५६ वर्षे, रा.१४ नंबर कांदळी जुन्नर) यांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment