संभाजीनगरचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सतीश चव्हाण यांनी शनिवारी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत चव्हाण यांनी पक्षप्रवेश केला.
चव्हाण हे संभाजीनगर येथून स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्यांचा अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश हा शरद पवार यांच्या पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
