पुणे – नाशिक महामार्गावर ९ जणांना चिरडणाऱ्या “त्या” ड्रायव्हरच्या मुसक्या आवळल्या 

पुणे : पुण्यात काल (शुक्रवारी) भीषण अपघाताची घटना घडली होती. पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव परिसरात हा अपघात (Pune Accident) झाला होता. या घटनेमध्ये नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

नारायणगाव जवळ हा अपघात काल (शुक्रवारी) सकाळी दहाच्या सुमारास झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला होता. आयशरने मागून घडक दिल्याने ही मॅक्स ऑटो पुढे असलेल्या एसटीबसवरती फेकली गेली. या घटनेमध्ये चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर फरार झालेल्या आयशर चालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अपघातानंतर आयशर चालक फरार झाला होता.

अपघातानंतर आयशर चालक फरार झाला होता, त्याला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे. चाकण परिसरातून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. रोहित कुमार जगमालसिंग चौधरी असे या आयशर चालकाचे नाव आहे. हरियाणा येथे पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स.फौ.दीपक साबळे, पोहवा. राजु मोमीन, पोहवा. विक्रम तापकीर, पोहवा. संदीप वारे, पोशी. अक्षय नवले, पोशी. निलेश सुपेकर यांनी केली आहे.

पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव येथील अपघातात नऊ जणांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे – नाशिक महामार्गावरती एसटीच्या मागे मॅक्स ऑटो जात होती. तर त्याच्या पाठीमागून आयशर टेम्पो जात होता. आयशरने जोरात धडक दिल्याने मॅक्स ऑटो हा बसवर जाऊन आपटली. दोन्ही गाड्यांच्यामध्ये आल्याने मॅक्स ऑटो मधील प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत.

Leave a Comment