रमेश फिरोदिया महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला संपन्न..

संगमनेर तालुक्यातील साकुर येथील रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिशाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे आयोजन कामटवाडी ता- पारनेर येथे दिनांक 13 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांनामध्ये वाचन कौशल्य विकसित व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता वाढीस लागावी या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ हेमलता राठोड ,कारभारी आहेर, केंद्र कार्यवाहक प्रा. योगेश साळुंके,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी व विभागीय समन्वयक प्रा.म्हतू खेमनर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. गणेश साळुंके व आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेची पहिले पुष्प प्रा. बाबासाहेब खरात यांनी मन करा रे प्रसन्न या विषयावर गुंफले व विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. ते बोलताना म्हणाले की बिनभिंतीची शाळा म्हणजे बहिशाल व्याख्यान माला. आपले मन नेहमी प्रसन्न असले पाहिजे, आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला व त्यास कष्टाची जोड दिली तर आयुष्यात यशस्वी होणे सोपे आहे. आपण आपल्या ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकता.

दुसरे पुष्प युवा प्रबोधनकार निलेश परबत यांनी प्रेम शब्दांच्या पलीकडे या विषयावर गुंफले ते म्हणाले की आपले प्रेम हे देशावरती, राष्ट्रावरती आपल्या कामावरती निस्वार्थ असले पाहिजे.प्रेम हा शब्दाच्या पलीकडे असलेल्या भावनाशी संबंधित आहे. शब्दाच्या पलीकडे जा मग प्रेम दिसून येते.

दि. 15 जानेवारी 2025 रोजी साईबाबा महाविद्यालयाचे प्रा. शिवनाथ तक्ते यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे, त्यामुळे सर्वांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अर्पिता पुरी हिने केले तर आभार केंद्र कार्यवाहक प्रा. योगेश साळुंके यांनी मांनले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेंद्र लेंडे यांनी केले. यावेळेस सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Comment