आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता बजेटआधीच सर्वसामान्यांना मोठे गिफ्ट मिळाले आहे. कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात केली आहे.
1 फेब्रुवारी 2025 पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी नवीन दर लागू असतील. गॅस सिलेंडरची किंमत 7 रुपयांनी कमी झाली आहे. आजपासून दिल्ली गॅस सिलेंडरची किंमत 1804 रुपयांवरून 1979 रुपये झाली आहे.
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली असली तरीही घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, मुंबईमध्ये आता व्यावसायिक गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 1756 रुपयांऐवजी 1749.50 रुपये खर्च करावे लागतील.
कंपन्यांनी यावर्षी सलग दुसऱ्यांना एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कपात केली आहे. 1 जानेवारीला देखील कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 14 ते 16 रुपयांनी कपात केली होती. त्यामुळे यावर्षातील ही सलग दुसरी कपात आहे.
एकीकडे व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली असली तरीही घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही मोठा बदल झालेला नाही. सध्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत दिल्लीत 803 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.
