मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन परिचय होतील.
कर्क : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.
कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
तूळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
धनू : गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मकर : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्दीने कार्यरत राहाल.
कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.
मीन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
