रमेश फिरोदिया महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान संपन्न

संगमनेर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय साकुर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 20 जानेवारी 2025 ते 22 जानेवारी 2025 रोजी निर्भय कन्या अभियान महाविद्यालयात संपन्न झाले.दि. 20 जानेवारी 2025 रोजी प्रा. स्मिता गुणे यांनी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर सर्व विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होणे गरजेचे आहे, व्यक्तिमत्व विकास म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या क्षमता आणि गुणधर्म विकसित करणे त्यामुळे त्या विद्यार्थिनीला त्याच्या उद्दिष्टांना साध्य करण्यास मदत होते. यावेळेस व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.डॉ. हेमलता राठोड,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.गणेश साळुंके, प्रा. कल्पना शेळके, प्रा. जया रक्टे, प्रा.प्रियंका हाके उपस्थित होत्या.

दि.21 जानेवारी 2025 रोजी वेद स्पर्श हॉस्पिटलच्या डॉ. सविता इघे यांनी विद्यार्थिनींना महिलांचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले.महिलांचे आरोग्य हा एक महत्त्वाचा विषय आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांनी विविध आजार व त्यांची लक्षणे यांची माहिती दिली.

दि.22 जानेवारी 2025 रोजी मा. राजेंद्र अंकप यांनी संरक्षण काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षण दिले व आपल्याला स्वतःचे रक्षण कसे करता येईल याचे धडे दिले. सर्व विद्यार्थिनींनी समर्पकपणे आपला सहभाग या अभियानात नोंदविला.

महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो .डॉ. हेमलता राठोड यांनी सर्व विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले व या अभियानाचा उद्देश व उपयोगिता स्पष्ट केली.

या कार्यशाळेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.गणेश साळुंके, प्रा.कल्पना शेळके, प्रा. जया रकटे, प्रा .प्रियंका हाके, प्रा .वृषाली डोके, प्रा. सिरीन शेख, प्रा.स्वाती ढोकरे, प्रा . आरजु शेख, प्रा.शबाना शेख व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Leave a Comment