संगमनेर(DSNews24/सतिश फापाळे) तालुक्यातील पठार भागातील कौठे मलकापूर शिवारात दारू पिऊन आलेल्या नवरोबाचा मोबाईल बायकोने पाहायला घेतला आणि त्यात बाईच्या आवाजाची रेकॉर्डिंग ऐकली म्हणून मद्यधुंद नवऱ्याने पत्नीला जबरी मारहाण केल्याची घटना मंगळवार दि.४ एप्रिल रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली आहे.
कौठे मलकापूर शिवारात घरकाम तसेच शेतीकाम करणारी २९ वर्षीय गृहिणींचा पती नेहमी दारू पिऊन आला की पत्नीस शिवीगाळ करून मारहाण करत असतो. मंगळवारी दुपारी एक वाजताच्या दरम्यान पत्नी घरी असताना नवरोबा दारू पिवून आला. त्यावेळी पत्नीने नवरोबाचा मोबाईल फोन पाहण्यासाठी घेतला. त्यात एका महिलेचे रेकॉर्डिंगचा आवाज आला. व तो आवाज पत्नी ऐकत आहे. हा आवाज नवरोबाने देखील ऐकला असता त्याने घाईगडबडीने पत्नीच्या हातातून मोबाईल फोन हिसकावून घेतला.
आणि शिवीगाळ करू लागला तर दारूच्या नशेत लाथाबुक्क्यांनी मारहाण देखील केली. पुढे मद्यधुंद झालेला नवरोबाने तिला खाली पाडून तिच्या पोटावर व छातीवर पाय दिला. हे सर्व काही करून नशेडी मद्यधुंद नवरदेव थांबेना. त्याने पत्नीचे केस धरून ओढले. घरातील लोखंडी रॉडने मांडीवर व तळपायावर जबर मारहाण केली. तसेच तिच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र काढून घेत तिला जिवे मारण्याची धमकी दिली.
वरील घटनेनुसार कौठे मलकापूर शिवारात घरकाम तसेच शेतीकाम करनाऱ्या २९ वर्षीय गृहिणी पत्नीने आपल्या दारुड्या नवरोबा विरूध्द जबरी मारहाण केल्या प्रकरणी घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शन नुसार पो. ना.बी. वाय गोडे करत आहे.
या दरम्यान पठार भागातील बहुतांश गावांमध्ये अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. मद्य विक्री करणारे छोटे_ मोठे हॉटेल्स तसेच पानटपरी यांची देखील संख्या वाढली असून राजरोसपणे अवैध दारू विक्री केली जात आहे. या अवैध दारू विक्रीने येथील तरुण पिढी देखील व्यसनांध होत असल्याने दिवसेंदिवस घरेलु हिंसेचे प्रकारात भर पडत आहे.घरा घरात दारू पिऊन मद्यधुंद झालेले तरुण भांडण, हाणामाऱ्या करत आहे. तर मारहाणीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे.या अवैध दारू विक्रीचे धंद्यावर पोलिस प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे असल्याची चर्चा जाणकार व्यक्ती करत आहे
