पारनेर (DSNews24/किरण पुरी) गेली 40 वर्षापासून सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडून पाण्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. आता भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेला लढा थांबू नका, वेळेप्रसंगी गुराढोरांसह आमच आख्खे गाव आपल्या पाठीशी उभे करू असे आश्वासन सरपंच बाजीराव दूधाडे यांनी दिलंय.
भूमिपुत्र शेतकरी संघटना व पारनेर तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित गाव तिथे कृती समिती अभियानाच्या कार्यक्रमात सरपंच बाजीराव दुधाडे बोलत होते. यावेळी लोणी हवेली येथे कृति समितीची स्थापना करण्यात आली. या अभियानात ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी अशोक आंधळे, बाळशिराम पायमोडे, संतोष वाबळे, अन्सार पटेल, अरुण बेलकर, अनिल सोबले, गोरख पठारे, राहुल गुंड, मंजाबापू वाडेकर, सरपंच बाजीराव दुधाडे, सचिन दुधाडे, बाळकृष्ण दुधाडे, संजय कोल्हे, बाळकृष्ण कोल्हे, युवराज कोल्हे, देवराम कोल्हे, रामदास कोल्हे, राजू कोल्हे, अंकुश सोंडकर, सोपान सोंडकर, अनिल कोल्हे, दगडू कोल्हे, अंकुश कोल्हे, भीमाजी कोल्हे, जिजाबापू कोल्हे, एकनाथ कोल्हे, दत्तात्रय दुधाडे, प्रभाकर कोल्हे, भास्कर कोल्हे, दगडू कोल्हे, अर्जुन तडके, श्रीरंग साठे, भानुदास कोल्हे, दत्तात्रय दुधाडे, राजेंद्र दुधाडे, अण्णासाहेब कोल्हे, विलास कोल्हे, दत्तात्रय कोल्हे, दत्तात्रय बोरुडे, राजाराम कोल्हे, बाबासाहेब बोरुडे, दौलत कोल्हे, मच्छिंद्र कोल्हे, चांगदेव कोल्हे, अशोक कोल्हे, इंद्रावन सोंडकर, गोरख साठे, सिताराम दुधाडे, दशरथ देशमाने, प्रकाश कोल्हे, बाबुराव साठे, जिजाबापू दुधाडे, सुभाष दुधाडे, दत्तात्रय कोल्हे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
