बिग ब्रेकिंग! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच अपघाती निधन

अकोला : राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधन झाले आहे. तुकाराम बिडकर हे दुचाकीने जात असताना एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात तुकाराम बिडकर गंभीर जखमी झाले होते, त्यांना तातडीने अकोलामधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. माजी तुकाराम बिडकर हे गुरुवारी (१३ फेब्रुवारी) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन परतत होते. तेव्हा अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी जवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला.

 

नेमकं काय घडलं?

अकोला जिल्ह्यातील अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मुर्तीजापुरचे माजी आमदार तुकाराम बिरकड बिडकर हे अकोला विमानतळावरून भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बावनकुळे यांना भेटून दुचाकीने घरी येत होते. यावेळी अकोलामधील शिवणी शिवर गावाजवळील पेट्रोल पंपासमोर एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कोण आहे तुकाराम बिडकर?

माजी आमदार तुकाराम बिरकड यांनी 2004 ते 2009 या काळात आमदारकी भुषवली होती. मुर्तीजापूर मतदारसंघाचे आमदार होते. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात होते विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचा माळी समाजातील मोठा चेहरा होते. आमदार होण्याआधी तुकाराम बिडकर अकोला जिल्हा परिषदेत सभापती होते.

Leave a Comment