मेष : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.
कन्या : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
तूळ : प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
वृश्चिक : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
मकर : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन आनंदी आणि आशावादी राहील.
कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
