मेष – तुम्ही कुणाला विरोधी समजत नाही त्यामुळेच तुम्ही नेहमीच मोठे राहता. नेहमीच मदतीचा हात पुढे करता, पण सावध रहा.
वृषभ – आजचे काम उद्यावर टाकू नका. आवडीचे पदार्थ खाण्यास मिळतील. कठीण काम अगोदर करून घ्या.
मिथुन – मौज-मजा कराल. आनंदाचा क्षण येईल. वास्तू, जमीन खरेदीचा विचार कराल. वादाला महत्त्व देऊ नका.
कर्क – वरिष्ठांचा सल्ला घ्या म्हणजे कोणताही निर्णय चुकणार नाही. हुशारी ठेवा. रागावर संयम ठेवा.
सिंह – धंद्यात फायदा होईल. बुद्धिचातुर्याने वादावर पडदा टकता येईल. स्पर्धेत जिंकाल. मदतीचा हात पुढे कराल.
कन्या – मन स्थिर ठेवा. प्रगतीची संधी वेगळ्या वळणाने येऊ शकते. धंदा वाढेल. कठीण काम करून घ्या.
तूळ – विचारपूर्वक निर्णय घ्या. महत्त्वाची वस्तू घेण्याचे विसरू नका. वादाला महत्त्व देऊ नका.
वृश्चिक – आजचे काम करून घ्या. नव्या विषयावर विचार करण्याची वेळ येईल. एकी ठेवा.
धनु – विचारवंतांचा सल्ला घेता येईल. सहवासाने माणूस घडतो. वाद महत्त्वाचा नसतो.
मकर – लोकांच्या वागण्याबोलण्याचा विचार करा. तुमचे धोरण तुम्हाला यावरून ठरवता येईल.
कुंभ – प्रकृतीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. दुखापत संभवते. पोटाचा त्रास होऊ शकतो.
मीन – घरातील माणसांच्या बरोबर वेळ घालवावा लागेल. पद मिळेल. धंद्यात फायदा होईल.
