ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का 

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना आणि भाजपात प्रवेश केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात असे संकेत मिळत आहेत.

या पार्श्वभूमीवर इतर पक्षात होणारे पक्षप्रवेश हे ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरत आहेत. आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे दोन बडे नेते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

माजी मंत्री उत्तम खंदारे, माजी आमदार शिवरन पाटील, दोन जिल्हाप्रमुख आणि एक सहसंपर्कप्रमुख आज ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश होणार आहे.

उत्तम खंदारे आणि शिवरन पाटील यांच्यासोबतच बुलढाणा, वाशिम, सोलापूर या जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी शिवसेना नेते संजय जाधव, भावना गवळी आणि आमशा पाडवी यांची देखील उपस्थिती असणार आहे

Leave a Comment