राज्यातील आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अनेक मोठे बदल करण्यात येत आहेत.

सुरुवातीला आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत.

कोणत्या अधिकाऱ्यांची बदली कुठे?

1. राधाविनोद शर्मा (IAS:RR:2012) महानगर सहआयुक्त, MMRDA, मुंबई यांची मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

2. एम.जे. प्रदीप चंद्रेन (IAS:RR:2012) अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांची पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

3. बाबासाहेब बेलदार (IAS:SCS:2015) अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांची अल्पसंख्याक विकास आयुक्त, छत्रपती संभाजीनगर या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

4. जगदीश मिनियार (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, छत्रपती संभाजी नगर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

5. गोपीचंद कदम (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, सोलापूर यांची अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6. वैदेही रानडे (IAS:SCS:2015) सह व्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

7. डॉ. अर्जुन चिखले (IAS:SCS:2015) सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर यांची फी नियामक प्राधिकरण, मुंबई, सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

8. डॉ. पंकज आशिया (IAS:RR:2016) जिल्हाधिकारी, यवतमाळ यांची अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment