बिग ब्रेकिंग! ठाकरे गटाचा बडा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात….

ठाकरे गटाचे नेते, छत्रपती संभाजीनगरचे आमदार आणि सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते असलेले अंबादास दानवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलंय.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्याने त्यांच्याकडे येणाऱ्या नेते, कार्यकर्त्यांचा ओघ आणखी वाढणार आहे, असं भाकित यापूर्वीच अनेकांनी केलंय. त्यात आता अंबादास दानवे यांचं नाव आल्याने चर्चांना उधाण आलंय. मंत्री उदय सामंत यांनी अयोध्येतील एका पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलंय.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार, खासदार सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाची विशेष पूजा श्रीरामाच्या मंदिरात केली जाणार आहे. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यावरून जोरदार टीका केली आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता उदय सामंत म्हणाले, ‘ अंबादास दानवे यांना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलण्याशिवाय पर्याय नाही.

कारण अंबादास दानवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं वातावरण आहे. शिंदे साहेबांवर टीका करणं त्यांना क्रमप्राप्तच आहे. पण मी शिंदे यांच्या संपर्कात नाही, हे दाखवण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे दुसऱ्याचं बघून फक्त टीका करतात. त्याला फार अर्थ नाही… असं उदय सामंत म्हणालेत.

Leave a Comment