जुन्नरच्या किशोर तांबेंच खुन प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेने केले २४ तासांत उघड ; दोन जणांना अटक

संगमनेर : जुन्नर तालुक्यातील तांबेवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटी चे संचालक किशोर तांबे यांच्या खुनाचा गुन्हा चोवीस तासांच्या आत उघडकीस आणण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठं यश मिळाले आहे.

याप्रकरणी आरोपी पांडुरंग जिजाभाऊ तांबे (वय 39 वर्षे) रा तांबेवाडी बेल्हे ता जुन्नर जि पुणे व महेश गोरखनाथ कसाळ (वय 30 वर्ष) रा आळेफाटा ता जुन्नर जि पुणे यांच्या मुसक्या आवळल्या असून गुन्ह्यात वापरलेली वॅगनआर कार जप्त करण्यात आली आहे.

अधिक मिळालेली माहिती अशी की, आळेफाटा पोलीस स्टेशन येथे संतोष खंडु तांबे यांनी 5 एप्रिल रोजी रात्री साडे नऊ वाजता चुलत भाउ किशोर कोंडिभाऊ तांबे वय 40 वर्षे रा.तांबेवाडी ता.जुन्नर जि.पुणे येथून शेतात जातो असे सांगून निघून गेला असून परत तो घरी आलेला नाही. तरी त्याचा शोध घ्यावा अशी तक्रार दिली होती.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीस स्टेशनने क्षणाचाही विलंब न लावता सदरचा प्रकार हा खुन असण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उप विभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्षनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अविनाष षिळीमकर यांचे नियंत्रणाखाली आळेफाटा पोलीस स्टेषनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, स.पो.नि. सुनील बडगुजर व स्थागुषाचे स.पो.नि महादेव शेलार, पो.हवा.राजु मोमीन, पो.हवा.दिपक साबळे, पो.हवा. चंद्रकांत जाधव, पो.हवा.मंगेष थिगळे, पो.ना.संदिप वारे, पो.काॅ. अक्षय नवले, पो.काॅ.दगडु विरकर, आळेफाटा पोस्टे चे पो.हवा.विनोद गायकवाड, पो.ना. पंकज पारखे, पो.काॅ. अमित माळुंजे, पो.काॅ. हनुमंत ढोबळे, पो.काॅ.नवीन अरगडे, श्वान पथकाचे पोलीस उप निरीक्षक पवार, पो.ना.अषोक लोखंडे व श्वान दुर्गा यांनी सदर गुन्हयाच्या तपासाला गती देत शोधमोहीम सुरू केली.

तसेच सदर गुन्हयाचे तपासादरम्यान श्वान दुर्गा हिस मयताचे कपड्यांचा वास देेऊन मयताचा शोध सुरू केला. श्वान दुर्गा हीने मयताचा माग काढत एका कॅनाॅलजवळ व एका विहीरीजवळ गेली परंतु त्या ठिकाणी आजुबाजूला शोध घेऊन मयताचा ठाव ठिकाणा लागला नाही.

सदर गुन्हयाचा तपास चालु असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या स.पो.नी. शेलार, पो.हवा. दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, दगडू वीरकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी पांडुरंग जिजाभाऊ तांबे व महेष कासाळ यांनीच केलेला आहे.

सदर माहितीचे आधारे इसम नामे पांडुरंग जिजाभाऊ तांबे वय 39 वर्षे रा तांबेवाडी बेल्हे ता जुन्नर जि पुणे व महेश गोरखनाथ कसाळ वय 30 वर्ष रा आळेफाटा ता जुन्नर जि पुणे यांना आळेफाटा पोलीसांचे मदतीने ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी व्यावसायातील प्रतिस्पर्धेचा तसेच बदनामी केल्याचा राग मनात ठेवून पूर्व नियोजित कट करून संगणमत करून किशोर तांबे यांना दारू पाजून त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्यांचा खून करून मयत बाॅडी ही मुरलीधर पिंगळे यांच्या विहीरीत टाकल्याचे तपासात सांगितल्याची कबुली दिली. सदर गुन्हयाचा पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेषन येथे स.पो.नि. सुनील बडगुजर हे तपास करीत आहेत.

Leave a Comment