बिरेवाडी ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी संतप्त महिलांचा हंडा मोर्चा

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून नळ पाणी पुरवठा योजना सुरळीत चालत नसून नळांना वेळेवर पाणी येत नसल्याने संतप्त महिलांनी सोमवार दि. १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. तसेच सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक यांना संतप्त महिलांनी घेराव घालत नळाला पाणी का येत नाही असा जाब विचारत येत्या दहा दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत चालला नाही तर ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी दिला. यावेळी येत्या आठ दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत चालू केला जाईल असे आश्वासन आंदोलनकर्त्या महिलांना दिल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला.

अधिक माहिती अशी की, साकूर जवळील बिरेवाडी येथील ग्रामपंचायत अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. मुळा नदीवरून सदर पाणी पुरवठाद्वारे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गावात विविध वस्त्यांवर पाणी पुरवठा करण्यासाठी तीन फाटे काढले आहे. तसेच जवळपास १४२ ग्रामस्थांनी नळ कनेक्शन घेतले असून त्यांना पाणी पुरवठा करण्यात येतो. मुळा नदीला पाणी असतानाही गेल्या काही दिवसांपासून नळ पाणी पुरवठा सुरळीत चालतच नसल्याने सोमवार दि. १० एप्रिल रोजी अचानक सकाळी १० वाजता संतप्त महिला हंडे घेऊन हनुमान मंदिरासमोर जमल्या. तसेच ग्रामस्थही मोठ्या संख्येने जमले होते. त्यानंतर मंदिरापासून महिलांनी ग्रामपंचायत पर्यंत “आम्हाला पाणी द्या” अशा घोषणा देत हंडा मोर्चा काढला.

यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच उपस्थित नव्हते. अर्ध्या तासानंतर ग्रामसेवक नितीन पवार मोर्चास्थळी दाखल झाल्यानंतर संतप्त महिलांनी मोकळे हंडे वाजवून त्यांचं स्वागत केले. तसेच आम्हाला पाणी द्या, पाणी द्या अशी मागणी केली. त्यानंतर सरपंच निलम ढेंबरे व उपसरपंच आण्णासाहेब कढणे हे देखील आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर यावेळी संतप्त महिला व ग्रामस्थांनी जाब विचारत गेल्या काही दिवसांपासून नळांना पाणी का येत नाही असा सवाल विचारत घेराव घातला. तसेच येत्या दहा दिवसांत जर पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशाराच यावेळी संतप्त महिला व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला. यावेळी ग्रामसेवक नितीन पवार यांनी येत्या आठ दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत चालू केला जाईल असे आश्वासन आंदोलनकर्त्या महिला व ग्रामस्थांना दिल्यानंतर हंडा मोर्चा मागे घेण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी ग्रामसेवक नितीन पवार यांना निवेदन दिले.

यावेळी शारदा सागर, स्वाती भोसले, प्रमिला सागर, भागूबाई फासाटे, नंदाबाई क्षिरसागर, प्रमिला भोसले, लताबाई सागर, मनिषा फासाटे, लिलाबाई फासाटे, छाया सागर, हिराबाई फासाटे, वनिता पुरी, मंदा सागर, रंजना शेंडगे, विमल सागर, सलोचना फासाटे, मनिषा फासाटे, विजया फासाटे, पुष्पा सागर, कोमल सागर, रोहीणी सागर, कविता फासाटे, अर्चना पुरी, कमल पुरी, लता पुरी, सुनिता भोसले, निलम भोसले, मोहिनी सागर, कल्याणी सागर , लिलाबाई शेंडगे, सिंधूबाई सागर, उज्वला फासाटे, मंगल सागर, संगिता भोसले, मिना भोसले, अनिता ढेंबरे, सविता सागर, प्रतिभा ढेंबरे तसेच गुलाबराजे भोसले, पंढरीनाथ ढेंबरे, लहानू सागर, भास्कर ढेंबरे, अमोल सागर, तुकाराम शेंडगे, सुभाष ढेंबरे, आनंदा सागर, चेतन फासाटे, संकेत सागर, आदेश सागर, दशरथ पिंगळे, नवनाथ ढेंबरे, विक्रम सागर, पोपट पिंगळे, बाबुराव सागर, शाम सागर, नवनाथ भोसले, किरण पठारे, आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment