राज्यातील मोठा पाऊस संपला, आजपासून….

पुणे : राज्यातील मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला अवकाळी पाऊस कमी होत असून, सोमवारपासून पुन्हा तापमानात वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. 13 एप्रिलपर्यंत राज्यात तुरळक पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

गेले तीन दिवस संपूर्ण देशासह राज्यातील बहुतांश भागांत अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली आहे.

मात्र, सोमवार, दि.10 एप्रिलपासून राज्यातील मोठा पाऊस थांबत आहे.

अजूनही विदर्भ ते कर्नाटक कमी दाबाचा पट्टा असल्याने विदर्भातील काही भागांत हलका पाऊस होईल, मात्र राज्यातील कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Comment