साकूरकरांनो सावधान, रात्री – अपरात्री घडतायेत ‘या’ घटना

संगमनेर(DSNews24/सतिश फापाळे) तालुक्यातील पठार भागातील साकुर परिसरात भुरट्या चोरीच्या घटनांनमध्ये वाढ झाली आहे.तर घारगाव पोलिसांत चोरीच्या वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

रविवार व सोमवार या दोन दिवसात पासष्ट हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल साकुर परिसरातून भुरट्या चोरट्यांनी लंपास केला आहे.यामुळे घारगाव पोलिसांना भुरट्या चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पठार भागातील साकुर परिसरातील ३६ वर्षीय शेतकरी जालिंदर रामभाऊ शेंडगे रा जांभूळवाडी,साकुर यांची साधारण १० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची काळे रंगाची ड्रीमयुगा मोटर सायकल क्रमांक एम एच १४ डी पी ९८४२ ही मोटर सायकल रवीवार दि.९ एप्रिल रोजी पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.

साकुर येथील ५२ वर्षीय शेतकरी भानुदास दशरथ खेमनर रा. साकुर यांचे राहत्या घराची कडी उघडुन घरात प्रवेश करत घरातील डब्यात ठेवलेले पाच हजार रुपये किमतीचे दोन सोन्याची नथ,वीस हजार रुपये किमतीचे दोन झूमके, सातशे रुपये किमतीचे चांदीचे पैजण, व पँटच्या खिशात ठेवलेली रोख रक्कम वीस हजार रुपये असा एकूण ४५७०० रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून अज्ञात चोरट्याने गुंडाळून लंपास केल्याची घटना सोमवार दि. १० एप्रिल रोजी रात्री १२ वाजता ते ४ वाजेच्या दरम्यान घडली आहे.

उंबरी बाळापूर येथील ३५ वर्षीय शेतमजूर सुनीता नंदू बर्डे यांचे गळ्यातील १० हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे जूने मंनचली मंगळसूत्र काळ्या मण्यात गुंफलेले दागिने नामदेव रंगनाथ सोन्नर रा.चिंचेवाडी यांनी साकुर येथे बर्डे यांचे गळ्यातून बळजबरीने हिसकावून तोडून घेऊन पळून गेल्याची घटना सोमवार दि.१० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास घडली आहे.

या प्रकरणी शेतकरी जालिंदर रामभाऊ शेंडगे,भानुदास दशरथ खेमनर यांचे फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतमजूर सुनीता नंदू बर्डे यांचे फिर्यादीनुसार नामदेव रंगनाथ सोन्नर यांचे विरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्व घटनांचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शन नुसार पो.हे. कॉ. डी. एस. वायाळ ,पो.ना. बी. वाय गोडे,पो.हे . कॉ.जी .पी. लोंढे करतं आहे.

Leave a Comment