IMD Update : राज्यातील मध्य महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यातील या 9 जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे. मागचे दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात वादळी पावसाने हजेरी लावली आहे.
दरम्यान राज्यातील 9 जिल्ह्यात पुढच्या 24 तासांत वादळी पावसाची शक्यता आहे. तर उद्यापासून (ता. 13) मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
