काळजी घ्या! नगर, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

राज्यात मार्च महिना अवकाळी पावसाचा झाला आहे. मार्च महिन्यानंतर एप्रिल महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट होत आहे.

आता पुणे आयएमडीने पुन्हा राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

तसेच राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट ऑरेंज दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर संकटांवर संकट आले आहे. कारण यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे अजून बाकी आहेत. आता पुन्हा पाऊस व गारपीटचे संकट आहे.

राज्यात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होणार आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी म्हटले आहे की,१४ एप्रिल रोजी नगर, पुणे बीड, उस्मानाबाद, सातारा आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट आहे. तसेच धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसेच १५ आणि १६ एप्रिल रोजी काही ठिकाणी येलो अलर्ट आहे. १७ एप्रिलपासून वातावरण पुन्हा चांगले होणार आहे.

Leave a Comment