संगमनेर (DSNews24 ) तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते कै. सिताराम सखाराम पाटील धुळगंड यांचे दुःखद निधन झाले आहे.
सिताराम धुळगंड यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तसेच ते गेली २० वर्षांपासून सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक देखील होते. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. मात्र त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
