भाजपचे ‘इतके’ आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नुकताच रद्द केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.

शरद पवार यांनी आज शनिवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईतील पक्ष कार्यालयात बैठक घेतली. याच दरम्यान कर्नाटक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हरी आर यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

कर्नाटकातील निवडणुकीत आम्ही किमान ४० जागांवर लढणार आहोत. तसेच सत्ताधारी भाजपचे ४-५ विद्यमान आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी आमच्या संपर्कात आहेत. बंगळूरचे माजी महापौरही लवकरच आमच्या पक्षात दाखल होऊ शकतात, असे हरी आर यांनी म्हटले आहे.

Leave a Comment