IMD Update : नगर, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील ३-४ तास…

IMD Update : राज्यात आजही अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. विशेष म्हणजे पुढचे तीन ते चार तास महत्त्वाचे आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

या दरम्यान या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितासाच्या वेगाने वारे वाहतील. काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढचे तीन ते चार तास महत्त्वाचे आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

Leave a Comment