दिल्ली : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर दिल्यामुळे दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आयपीएल 2025 स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती.
पण अमेरिकेच्या कथित हस्तक्षेपानंतर दोन्ही देशात 10 मे रोजी शस्त्रसंधी झाली. यानंतर आता आयपीएल 2025 स्पर्धा पुन्हा सुरू होण्यास सज्ज झाली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) टाटा आयपीएल 2025 पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. सरकार, सुरक्षा संस्था आणि सर्व प्रमुख आयपीएल फ्रेंचायसींसोबत चर्चा केल्यानंतर बोर्डाने उर्वरित हंगाम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल 2025 च्या उर्वरीत सामन्यांना 17 मे 2025 पासून सुरू होणार असून 3 जून 2025 रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. आयपीएल 2025 चे उर्वरीत एकूण 17 सामने 6 ठिकाणी खेळवले जातील. सुधारित वेळापत्रकात दोन डबल-हेडर्सचा समावेश करण्यात आला असून हे सामने दोन रविवारी खेळवले जातील.
प्लेऑफ सामन्यासाठी 4 संघ पात्र ठरल्यानंतर पहिला क्वालिफायर सामना 29 मे रोजी खेळवला जाईल. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 मे रोजी एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. तसेच 1 जून रोजी दुसरा क्वालिफायर सामना होईल. पहिल्या क्वालिफायर आणि दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात विजय मिळवाणारे दोन्ही संघ 3 जून रोजी अंतिम सामन्यात आमनेसामने येतील. दरम्यान, प्लेऑफ सामन्यांचे ठिकाण नंतरच्या टप्प्यात जाहीर केले जाईल.
उर्वरित सामने पुढीलप्रमाणे :
17 मे – शनिवार – 7.30 PM – बंगळुरू – रॉयल चॅलेंजर्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
18 मे – रविवार – 7.30 PM – जयपूर – राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्स
18 मे – रविवार – 7.30 PM – दिल्ली – दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात टायटन्स
19 मे – सोमवार – 7.30 PM – लखनौ – लखनौ सुपर जायंट्स वि. सनरायजर्स हैदराबाद
20 मे – मंगळवार – 7.30 PM – दिल्ली – चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स
21 मे – बुधवार – 7.30 PM – मुंबई – मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स
22 मे – गुरुवार – 7.30 PM – अहमदाबाद – गुजरात टायटन्स वि. लखनौ सुपर जायंट्स
23 मे – शुक्रवार – 7.30 PM – बंगळुरू- रॉयल चॅलेंजर्स वि. सनरायजर्स हैदराबाद
24 मे – शनिवार – 7.30 PM – जयपूर – पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स
25 मे – रविवार – 3.30 PM – अहमदाबाद – गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स
25 मे – रविवार – 7.30 PM – दिल्ली – सनरायजर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स
26 मे – सोमवार – 7.30 PM – जयपूर – पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स
27 मे – मंगळवार – 7.30 PM – लखनौ – लखनौ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
29 मे – क्वालिफायर -1 – गुरुवार- 7.30 PM – स्थान अजून निश्चित नाही
30 मे – इलिमिनेटर – शुक्रवार – 7.30 PM – स्थान अजून निश्चित नाही
1 जून – क्वालिफायर – 2 – रविवार – 7.30 PM – स्थान अजून निश्चित नाही
3 जून – अंतिम सामना – मंगळवार – 7.30 PM- स्थान अजून निश्चित नाही
