अहिल्यानगर – नेवासा तालुक्यातील इमामपूर येथे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आकाशात अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन परिसरात सोसाट्याचा वारा सुटला होता.
त्यात आकाशात विजांचा कडकडाट ऐकू येत होता. त्याचवेळी शेतात काम सुरू असलेल्या तरुण शेतकरी गणेश शिवाजी काळे (वय 34) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
इमामपूर गावातील पोपट जानकीराम काळे यांच्या शेतात विद्युत रोहित्र (डीपी) आहे. ते विद्युत रोहित्र जळाले होते. पण काल ते दुरुस्त करून बसविण्यात आल्यानंतर त्या रोहित्रावरून विद्युत पुरवठा करणार्या नवीन विद्युत तारा कामगार व शेतकर्यांच्या मदतीने ओढण्याचे काम सुरू होते.
पण सायंकाळी साडेसहा वाजता काम सुरू असताना त्या परिसरात विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळली. त्यामध्ये गणेश शिवाजी काळे (वय 34) या शेतकर्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला
